मूल्याधिष्टीत शिक्षण, व्यक्तिमत्व विकास व सामान्य ज्ञान या विषयाची पुस्तके संदर्भासाठी खाली दिली आहेत.
- प्रभावी व्यक्तिमत्त्व - डॉ. अशोक निरफराके, प्रा. वनिता पटवर्धन - विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग, पुणे - ३०. किंमत - ३० रुपये
- अभ्यासपुस्तिका व्यक्तिमत्त्व विकास - इ. ९ वी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-४. किंमत - ५४ रुपये
- अभ्यासपुस्तिका व्यक्तिमत्त्व विकास - इ. १० वी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-४. किंमत - ५० रुपये
- ‘‘मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्त्व विकास’’ - प्रकाशन - विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत. - किंमत - १०० रुपये. (सध्या पुस्तक छपाई काम चालू आहे.)
- दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा आत्मविश्वास सामान्य ज्ञान -संकल्पना व संकलन - यजुर्वेंद्र महाजन - दीपस्तंभ प्रकाशन, जळगाव - किंमत - १२५ रुपये.
ज्या शाळेमध्ये १०० किंवा त्या पेक्षा जास्त विद्यार्थी या प्रमाणपत्र परीक्षेला बसतील त्या शाळेच्या प्राचार्यांना / मुख्याध्यापकांना वरील एकूण पाच पुस्तके संदर्भग्रंथ म्हणून भेट देण्यात येतील.
टीप : विश्वशांती केंद्र(आळंदी), माईर्स एमआयटी पुणे, भारत या संस्थेच्या वतीने अभ्यासक्रमावर आधारित "मूल्याधिष्टीत वैश्विक शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्व विकास" प्रमाण परीक्षा पुस्तिका तयार करण्यात आली आहे. त्या पुस्तिकेची किंमत १००/- रू ठेवण्यात आली आहे. परीक्षेला बसणारे विदयार्थी या पुस्तिकेद्वारे परीक्षेची उत्तम तयारी करू शकतील. ज्या विद्यार्थ्याना संदर्भ पुस्तिका अभ्यासासाठी वैय्यक्तिक हवी आहे, त्यांच्या साठी सदर पुस्तिका खालील पत्यावर उपलब्ध आहे तरी तेथून विद्यार्थ्यानी ती पुस्तिका विकत घ्यावी.
❇ कार्यालय - वैश्विक मूल्याधिष्टीत शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्व विकास अभ्यासक्रम
माईर्स एमआयटी पुणे, पौड रोड, कोथरूड, पुणे - ४११०३८
"Universal Value Based Education System and
Winning Personality Development"
State Level Certificate Examination,
MAEER's MIT, Pune, India
S. N. 124, Paud Road, Pune – 411038 Maharashtra, India.
E-mail : valueeducation1949@gmail.com
Tel. : +91 – 20- 30273658
Website : wpcvalue-education.com
परीक्षेसंबंधी महत्वाच्या सूचना
(महत्त्वाचा वेळा/दिनांक)
- सदर माहितीपुस्तिका, परीक्षा फॉर्म प्रत्येक केंद्रावर केंद्र प्रमुख/सहसमन्वयक यांचेकडे दि. १ डिसेंबर २०१९ पासून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
- परीक्षेचे फॉर्म विद्यार्थ्यांनी दि. १ जानेवारी २०२० पर्यंत केंद्र प्रमुख/सहसमन्वयक यांचेकडे भरून द्यावयाचे आहेत.
- परीक्षेचे नोंदणी शुल्क रु: १००/- विद्यार्थ्यांनी केंद्रप्रमुखाकडे अथवा WPC youth mission च्या बँक ऑफ इंडिया एमआयटी कोथरूड शाखा येथील खाते क्र. ०५३०२०११००००१७७ (IFSC NO: BKID0000530) मध्ये कोणत्याही बँकेद्वारे पाठवायचे आहेत.
- परीक्षेचे सदर फॉर्म www.wpcvalue-education.com संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.विदयार्थ्यानी हा फॉर्म डाउनलोड करून भरावा.
- विद्यार्थ्यांचे परीक्षेचे क्रमांक दि. ४ जानेवारी २०२० रोजी त्या त्या परीक्षा केंद्रांवर लावण्यात येतील. याशिवाय सदर क्रमांक www.wpcvalue-education.com या वेबसाईटवरही टाकण्यात येतील.
- परीक्षा रविवार, ५ जानेवारी २०२० रोजी होईल, परीक्षेसाठी प्रत्येकी १०० गुणांचे एकूण २ पेपर्स असतील.
पेपर क्र. १ :
यशस्वी व्यक्तिमत्व विकास आणि सामान्य ज्ञान
पेपर क्र. २ :
वैश्विक मूल्याधिष्टीत शिक्षण आणि भारतीय अस्मिता
- प्रश्नपत्रिकेवरच विद्यार्थ्यांनी उत्तरे लिहावयाची आहेत.
- परीक्षेचा निकाल १ मार्च २०२० रोजी त्या त्या परीक्षा केंद्रांवर लावण्यात येईल शिवाय www.wpcvalue-education.com या संकेतस्थळावरही निकाल घोषित करण्यात येईल.
- पारितोषिक समारंभ एमआयटी कोथरूड पुणे येथे सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते ३० दिवसाच्या अात मा. प्रा. डॉ. विश्वनाथ कराड सर यांच्या उपस्थितीत होईल.
- याशिवाय काही अडचण असल्यास कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
श्रीमती. मोहिनी कोंढाळकर
कार्यालयीन संपर्क
९९२३६९४५९७