अभ्यासक्रम

वैश्विक मूल्यांकन शिक्षण पद्धती आणि
यशस्वी व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र परिक्षा


 

मूल्याधिष्ठित शिक्षण

माध्यमिक शाळांच्या पातळीवर विद्यार्थ्यांच व्यक्तिमत्व बरंचसं प्रवाही, अस्थिर, बहुतांशपणे आकारहीन असतं. हळवेपण, भिडस्तपणा, भावनोत्कट , बेदरकार वृत्ती, व्यक्तिगत आवडी निवडी, राग, लोभ, रागीटपणा, उमेदपणा, विक्षिप्तपणा इ. अनेक गुण-अवगुण घेऊन विद्यार्थी शाळेत येत असतात. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची ही लक्षणे शोधून काढून या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हा या अभ्यासक्रमाचा मूळ हेतू आहे.

उत्तमाचा ध्यास आणि स्वयंनेतृत्वाची आस असणं म्हणजे व्यक्तिमत्वाचा खरा विकास. वास्तवाची जाणीव ठेवत भविष्याच्या उत्तुंग स्वप्नांनी झपाटले जाणे हा या अभ्यासक्रमाचा गाभा आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी जगण्याची पाटी न टाकता स्वत:वर, जगण्यावर भरभरून प्रेम करणारे अत्यंत प्रेरणादायी असे आयुष्य जगू शकतील व थोर विचारवंत स्वामी विवेकानंदाना अभिप्रेत असणारे युवक यातून तयार होऊन भारतीय संस्कृतीची चिरंतन मूल्ये उदा. मातृदेवोभव, पितृदेवोभव, आचार्यदेवोभव इ. मूल्यांचा अंगिकार करून साऱ्या जगाला मार्गदर्शन करणारा भारत देश हेच तरुण घडवू शकतील असा आम्हास पूर्ण विश्वास आहे.

यशस्वी व्यक्तिमत्व विकास व सामान्य ज्ञान अभ्यासक्रम

१. शारीरिक व्यक्तिमत्व ८. वैश्विक विकास
२. बौद्धिक विकास ९. आत्मिक विकास
३.भावनिक विकास १०. प्रसन्नता
४. कौटुंबिक विकास ११. संगत
५. कलात्मक विकास १२. माध्यमांचा परिणाम
६. सामाजिक विकास १३. भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञान
७. राष्ट्रीय विकास  १४. सामान्य ज्ञान

सामान्य ज्ञान

१. भारताची राज्यघटना ८. तीर्थस्थळे
२. स्वातंत्र्याची चळवळ ९. राष्ट्रीय खेळ
३. घटक राज्ये १०. प्रसिद्ध ग्रंथ व लेखक
४. नद्या, पर्वत, धरणे
५. समाजसुधारक
६. भारतीय शास्त्रज्ञ
७. आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ

वैश्विक मूल्याधिष्टीत शिक्षण आणि भारतीय अस्मिता अभ्यासक्रम

स्वच्छता, स्वावलंबन,कर्तव्यदक्षता,श्रमनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, शुचिता, भूतदया, निर्भयता, खिलाडूवृत्ती, समता, बंधुभाव, सर्वधर्मसहिष्णुता, न्यायप्रियता, सौजन्यशिलता, आदरभाव, सत्यप्रियता, अहिंसा, मानवता, निसर्गप्रेम, परस्पर सहकार्य , संयम, मानवी हक्क, लोकशाही, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, व्यक्तीशांती ते विश्वशांती, विनम्रता, प्राचीन विद्यापीठे, भारतीय संस्कृती, जागतिक संस्कृती, सर्व धर्मांची मुलभूत तत्वे, भारतातील संत व त्यांचे योगदान, महाराष्ट्रातील संत व त्यांचे सामाजिक समतेसाठी योगदान, विविध धर्मांचे सण, भारतीय तत्वज्ञान व परंपरा.


अभ्यासमंडळ

vdsir

प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड

अध्यक्ष विश्वशांती केंद्र (आळंदी)
माईर्स एमआयटी, पुणे, भारत

snsir

डॉ. एस. एन. पठाण (माजी कुलगुरू)

समन्वयक, मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण व
यशस्वी व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र परीक्षा

   माननीय सदस्य

more
डॉ. सदानंद मोरे

संजय उपाध्ये
sonagra
डॉ. रतनलाल सोनाग्रा